मौलवीकडून अल्पवयीन मुलावर बलात्कार : रमजानच्या बहाण्याने दृष्कर्म : पाकिस्तानातील घटना


Google image

लाहोर : वृत्तसंस्था 

पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गुजरात शहरामध्ये एका मौलवीने अल्पवयीन मुलाला रमजानच्या पार्श्वभूमीवर दुवा पढण्याच्या बहाण्याने मशिदीत बोलावून त्याचा रात्रभर लैंगिक छळ केला. पोलिसांनी मौलवी मोहम्मद रियाज विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

घटना ९ आणि १० मार्च दरम्यान च्या रात्रीची असून , मौलवीने मुलाला खाण्यातून झोपेचे औषध दिले. रात्रभर त्याच्यासोबत दुर्ष्कम केले. सकाळी ८ वाजता मुलगा उठल्यानंतर वेदनांनी विव्हळत होता.

मौलवीकडून अल्पवयीन मुलावर बलात्कार : रमजानच्या बहाण्याने दृष्कर्म :


मौलवी ला त्याने जाब विचारला असता , मौलवीने त्याला मारहाण केली आणि ठार मारण्याची धमकी दिली. अखेर ही बाब मुलाने कुटुबियांना सांगितल्यानंतर मौलवीविरोधात गुन्हा दाखल केला.

मौलवीवर अधिक विश्वास म्हणून मुलाने बनवला व्हिडीओ

२०२१ मध्ये लाहाेरच्या मदरशातील मौलवीने एका मुलासोबत अत्याचार केले होते . मुलाने तेव्हा तक्रार केली , तेव्हा त्याच्यावर कुणीही विश्वास ठेवला नाही. मग मुलाने त्याच्यावर करत असलेल्या दुर्ष्कमाचा व्हिडीओच बनवला.

(एका अहवालानुसार पाकिस्तानात रोज ८ मुलांना लैगिंक छळाचा सामना करावा लागतो)

(पुढारी)