IPL मध्ये एका संघात खेळणार १२ खेळाडू
IPL मध्ये एका संघात खेळणार १२ खेळाडू
आयपीएलच्या १६ व्या हंगामात बीसीसीआयने एक नवा नियम आणला आहे. आता आयपीएलच्या सामन्यात कोणताही संघ ११ नाही तर १२ खेळाडू खेळवू शकतो.. क्रिकेटच्या पारंपरिक नियमानुसार संघ ११ खेळाडूच खेळवू शकत होते. मात्र बीसीसीआयने आता इम्पॅक्ट प्लेअर हा नवा नियम आणून संघांना एक अतिरिक्त खेळाडू सामन्याच्या कोणत्याही टप्प्यावर संघात खेळवण्याची मुभा दिली आहे. मात्र जरी सामन्यात १२ खेळाडू खेळवण्याची मुभा असली तरी प्रत्यक्ष मैदानावर ११ खेळाडू खेळताना दिसतील. यासाठी बीसीसीआयने काही नियम घालून दिले आहेत.
काय आहेत imapct प्लेयर्सचे नियम ?
बीसीसीआयच्या नव्या नियमामुळे फ्रेंचायजींना आता सामन्यादरम्यान, इम्पॅक्ट प्लेअर आपल्या प्लेईंग ११ मध्ये समाविष्ट करता येणार आहे. हा खेळाडू फलंदाजी किंवा गोलंदाजी करताना वापरता येणार आहे. यासाठी कर्णधाराला संघासोबतच आपल्या चार बदली खेळाडूंची नावे नाणेफेकीनंतर द्यावी लागणार आहेत. यातील एक खेळाडू सामन्यादरम्यान खेळवता येणार आहे. हा इम्पॅक्ट प्लेअर सामन्यावेळी बॅटिंग, बॉलिंग किंवा फिल्डिंग करू शकतो.
IPL मध्ये एका संघात खेळणार १२ खेळाडू
मात्र जर संघाने प्लेईंग ११ मध्ये ४ विदेशी खेळाडू समाविष्ट केले असतील तर इम्पॅक्ट प्लेअर हा भारतीय खेळाडूच असला पाहिजे. जर संघाने ४ पेक्षा कमी विदेशी खेळाडू संघात घेतले तरच त्यांना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून विदेशी खेळाडू समाविष्ट करता येईल.
। बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, संघाने चार बदली खेळाडूंमध्ये समाविष्ट केलेल्या विदेशी खेळाडूला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापरता येऊ शकते. जर संघ विदेशी खेळाडू इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापरणार असेल तर कोणत्याही परिस्थितीत मैदानावर ५ वा विदेशी खेळाडू खेळवण्याची परवानगी असणार नाही.
| इम्पॅक्ट प्लेअर हा इनिंगच्या सुरूवातीला किंवा षटक पूर्ण झाल्यानंतर वापरता येईल.
फलंदाजीचा विचार केला तर इम्पॅक्ट प्लेअर हा विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाज रिटायर झाल्यावर षटकाच्या मधे कधीही घेता येईल.
IPL मध्ये एका संघात खेळणार १२ खेळाडू
| जरी इम्पॅक्ट प्लेअरला फलंदाजी, गोलंदाजी, फिल्डिंग करता येत असली तरी त्याला संघाचा कर्णधार होता येणार नाही.