वाहतूकदारांकडून शालेय पोषण आहारात चोरी
सांगली 24 तास : वार्ताहर
शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेश पोषण आहाराची चोरी करून वाहतूक केली जाते. ठेकेदारले झाले आहेत. त्यामुळे ठेकेदाराची चौकशी करून कारवाई करा, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र हुडी यांच्याकडे केले आहे.
वाहतूकदारांकडून शालेय पोषण आहारात चोरी
यातून
हुडी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यासाठी पोषण आहार पुरवठ्याचा ठेका तासगाव तालुक्यातील एकाकडे देण्यात आला आहे. ठेकेदार एका ट्रान्स्पोर्टच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळांना पोषण आहार पुरवठा करत आहे. यामध्ये ४० वाहने वज्रचौडे व आसपासच्या गावातील आहेत.
वाहतूकदारांकडून शालेय पोषण आहारात चोरी
ट्रान्स्पोर्टशी करार झालेला आहे. याच टेम्पोमधून शाळांना पोषण आहाराचा पुरवठा होत आहे. आहाराचा पुरवठा करताना वाहनांचे चालक पाईप मारून पोत्यातून पोषण आहाराची चोरी करत आहेत. शाळेत मुख्याध्यापक एकाच पोत्याचे वजन तपासून माल बरोबर असल्याचा सही-शिक्का करून देतात. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्व माल वजन करून घेतल्यास ठेकेदाराची चोरी उघडकीस येईल. मात्र मुख्याध्यापक तसे करीत नाहीत. याचाच गैरफायदा घेत आहेत. पोत्यातून काढलेला माल वाहतूकदार तासगाव तालुक्यातील बलगवडे आणि वायफळेजवळील गोडावूनमध्ये ठेवत आहेत. तेथून दोन खरेदीदार पोषण आहारातून चोरलेला माल कमी दराने खरेदी करून जादा दराने विक्री करत आहेत. आतापर्यंत या वाहतूकदारांनी अनेक टन माल परस्पर विक्री केला आहे.
(बातमी : पुढारी वृत्तसेवा सांगली)