स्टिंगची नशा आयुष्य संपवतेय ; स्वस्तात मिळणाऱ्या स्टिंग च्या आहारी लहान व पौढ Dangerous Sting Energy drink
![]() |
Google image |
स्टिंगची नशा आयुष्य संपवतेय ; स्वस्तात मिळणाऱ्या स्टिंग च्या आहारी लहान व पौढ स्टिंगची नशा आयुष्य संपवतेय ; Dangerous Sting energy
सध्या राज्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागात एनर्जी ड्रिंक्सच्या नावाखाली कॅफेनचे घटक असलेली थंडपेय बाजारात आली आहेत. पानटपरीवर सहज दहा-वीस रुपयांत ही पेय मिळत आहेत. यातून सौम्य प्रकारची नशा होत असल्याने लहान मुले, महिला पुरुषही याच्या आहारी गेले आहेत.
सध्या शहर व ग्रामीण भागात किराणा दुकान, हॉटेल, पानटपऱ्या थंडपेयाची दुकानांचे कप्पे एनर्जी ड्रिंक्सच्या बाटल्यांनी खचाखच भरलेली दिसतात, तर सर्वत्र या रिकाम्या बाटल्यांचा खच दिसून येत आहे. सहज व कमी पैशात मिळत असल्याने लहान मुले याच्या आहारी गेले आहेत. उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीही रात्री झोप येऊ नये म्हणून याचा सहारा घेतला आहे. वाहनचालकही मोठ्या प्रमाणात याचं सेवन करत आहेत. लहान मुले पार्टी करण्यासाठी या बाटल्या घेतात आणि दोन-तीन बाटल्या रिचवतात.
Dangerous sting energy drink
याचं सेवन केल्यास झोप येत नाही तर शरीरात स्फूर्ती निर्माण होते. पिल्यानंतर बराच काळ डोळे ताठर होतात आणि बऱ्यापैकी गुंगी येते. तोंडाचाही वास येत नाही. आणि झिंगही चार तास राहते. त्यामुळे सध्या याचा धोका माहीत नसलेले याच्या आहारी गेले आहेत.
दोनशे पन्नास मि.लि. च्या बाटलीत ७५ मिली ग्रॅमपेक्षा जास्त कॅफेन घेऊ नये, अशी नोंदही या बाटलीवर आहे तर सूचनेत लहान मुले, गरोदर माता,स्तनदा माता यांना धोकादायक असल्याची स्पष्ट नोंद आहे. या बाटल्यांत प्रत्येक १०० मि.लि.ला २९ मिली ग्रॅम कॅफेन असल्याची नोंद आहे. मात्र या बाटल्या थेट २५० मिलीच्या आहेत, तर दिवसभरात पाचशे मिलीपेक्षा जास्त घेऊ नये, असे स्पष्ट केले असले तरी या सहज उपलब्ध होत असलेल्या नशा गल्लोगल्ली मिळत असल्याने आता नवा धोका निर्माण झाला आहे. लहान मुलांच्या पालकांना आता सतर्क राहावे लागणार आहे.