![]() |
Google image |
सांगली २४ तास ; वार्ताहर
सांगलीसह जिल्ह्यातील सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचा धुरळा सुरु झाला आहे. बहुतांश ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप अशी सर्वपक्षीय पॅनेल होण्याची शक्यता आहे. इच्छुकांची संख्या जादा असल्याने सर्वच लढती चुरशीच्या होण्याची चिन्हे आहेत
सांगली, तासगाव, पलूस, विटा, इस्लामपूर, शिराळा आणि आटपाडी या सात बाजार समित्यांच्या निवडणूक होत ह आहे.
दि २७ मार्च ते दि. ३ एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. छाननी दि ५ रोजी आहे पात्र उमेदवारांची नावे दि. ६ एप्रिलला प्रसिद्ध होतील त्यानंतर दि. ६ ते २० अर्ज माघारीची मुदत आहे. दि. २१ एप्रिलला उमेदवारांची अतिम मतदार र यादी प्रसिध्द होणार आहे. दि. ३० एप्रिलला मतदान होईल. मतदान संपल्यानंतर त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.
या सात बाजार समित्यांसाठी २४ हजार ५२८ मतदार आहेत. त्यामध्ये सांगली बाजार समितीचे मिरज, कवठेमहांकाळ आणि जत या तीन तालुक्यात ८ हजार ६७५ मतदार आहेत. शिराळ्यात २ हजार ८८६ मतदार, आटपाडीत १ हजार ९९२, विट्यात ३ हजार १५९, पलूसमध्ये १ हजार १५८, इस्लामपूरमध्ये ४ हजार ७३९ तर तासगाव बाजार समितीचे १ हजार ९४९ मतदार आहेत.
सांगली बाजार समिती राजकीयदृष्ट्या महत्वाची आहे. या समितीचे मिरज, कवठेमहांकाळ आणि जत या तीन तालुक्यात कार्यक्षेत्र आहे. याठिकाणी सत्तेत येण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्नशील असतात. तर संचालक होण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. निवडणूक लांबल्याने आता तर इच्छुकांची संख्या मोठी आहे.
दैनिक पुढारी (पुरवणी - माय सांगली)