मणेराजुरीत टेम्पोला भीषण आग ; ड्रायव्हर चा जीव वाचला

आग लागलेला टेंम्पो



सांगली २४ तास : वार्ताहर


मणेराजुरी (ता. तासगाव) येथे रविवारी रात्री उशिरा आयशर टेंपोचा बर्निंग थरार ग्रामस्थांनी अनुभवला. प्रसंगावधानाने टेंपो चालकाचा जीव वाचला. टेंपो द्राक्षाच्या मोकळ्या क्रेट सहीत जळून खाक झाला. यामध्ये सुमारे अठरा ते वीस लाखाचे नुकसान झाले .


मणेराजरातील भवानी रस्त्यावर अनिल चव्हाण यांच्या घरात पश्चिम बंगाल येथील झेंडू नावाचा द्राक्ष व्यापारी राहतो. त्याचेकडून दररोज द्राक्ष गाडयांची आवक जावक होत असते. रविवारी रात्री दहाच्या दरम्यान पश्चिम बंगालला द्राक्षे पोहचवूकोणाचीच टेम्पो येवून थांबला होता. गाडीत चालक झोपला होता रात्री अकराच्या दरम्यान या टेंपोला अचानक आग लागली. याठिकाणी वस्ती भाग मोठा असून सर्वजण झोपेत होते. आगीमुळे कोणालाच काही समजेना. हौद्यात असणाऱ्या क्रेटला प्रारंभी आग लागली. हा-हा म्हणता ती भडकली.


हे ही वाचा ; मधमाशीच्या दंशाने पेंटरचा मृत्यू

आगीने ज्या लिंबाच्या झाडाखाली हा टेंपो लावला होता ते झाड ही जळाले. टेंपोच्या जवळ मोटारसायकली व घरे असल्याने आगीच्या घटनेने सर्वाची पळापळ सुरू झाली. केबिनमध्ये झोपलेल्या चालकाला हाका मारून जागे करण्याचा प्रयत्न केला परंतु झोपेत असणाऱ्या चालकाला कोणाचीच हाक ऐकू आली नाही. शेवटी प्रसंगावधान राखून किरण जमदाडे संजय पाटील, राहूल जमदाडे ,सतीश जमदाडे, किशोर जमदाडे व युवकांनी समोरील काच फोडून चालकाला बाहेर काढले आग डिझेल टँक जवळ येत असल्याने जमावाने पाणी मारून आग आटोक्यात आणली अन्यथा अनर्थ घडला असता.