हातकणंगले तालुक्यात मधमाशीच्या दंशाने पेंटरचा मृत्यू ; कामावरून परतताना दंश


मृत - संतोष कांबळे

सांगली २४ तास ; वार्ताहर

कोल्हापूर : मधमाशीने दंश केल्याने संतोष राजाराम कांबळे (वय ३५, रा.मेनन कॉलनी, शिरोली पुलाची, ता.हातकणंगले) या पेंटरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


हातकणंगले तालुक्यात मधमाशीच्या दंशाने पेंटरचा मृत्यू

   शिरोली पुलाची येथील कारखान्यात संतोष कांबळे पेंटरचा म्हणून काम करत होते. मंगळवार दि.२१ रोजी कामाची सुट्टी झाल्यानंतर दुचाकीवरून घरी परतताना नागाव फाट्याजवळ मधमाशीने त्यांच्या डोळ्याजवळ दंश केला. किरकोळ समजून ते लगेच दवाखान्यात गेले नाहीत.पण रात्रभर तीव्र वेदना होत होत्या.तसेच चेहर्याला सूज आली होती.


त्रास होऊ लागल्याने दुसर्या दिवशी त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.मात्र प्रकृती खालवल्याने सोमवारी दि.२७ ला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हातकणंगले तालुक्यात मधमाशीच्या दंशाने पेंटरचा मृत्यू

कांबळे यांची आर्थिक स्थिती बेताची आहे.त्यांच्या मागे पत्नी व लहान मुलगा आहे.